Wednesday 9 November 2011

नाते तुझे-माझे ..

स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो !!

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!

हिची वाट पाहत बसतो....

हे आत्ता रोजच झाले आहे
मी एकटाच तिची वाट पाहत असतो
आत्ता येइल मग येइल
हिची वाट पाहत बसतो....

अजुन कशी आली नाही
रोज याच वेळी येते
मग आज काय झाले???
आज मीच तर लेट नाही???

का इतका वेळ लागत असेल???
मनात भरपूर शंका येतायत...
ह्रुदयाच्ये ठोके
घड्यालाचे कात्याहून जलद पडतायत
आज मात्र ठरवले आहे मी
नाही भेटली जर आज ती.....

तर दूसरी सोबत घरी जाणार आहे ....

एवढ्यात....

अरेच्या ती तर आली
हां फक्त थोडा वेळ लेट झाली
मनाला एक सुखद आनंद मिळाला
पण...

तितक्यात एक अन्नौंसमेंट झाली

"प्लेटफोर्म क्रमांक दोनची लोकल कार्शेदाला जाणार आहे
कृपया या लोकालने प्रवास करू नये..."

म्हणजे ती "ती" नव्हती
मन पुन्हा उदास झाले
पुन्हा तिच्या वाटेशी
डोळे लावून बसले

हे आत्ता रोजच झाले आहे
मी एकटाच तिची वाट पाहत असतो
आत्ता येइल मग येइल
हिची वाट पाहत बसतो....

आपलं नातं!!!!

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला

तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो

हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

Tuesday 8 November 2011

कुणीतरी आठवणं काढतय

कुणीतरी आठवणं काढतय
वैभव जोशी

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?


—चित्तरंजन