Thursday, 15 September 2011

बायको आणि ती

प्रत्येक पुरशाच्या आयुष्यात येतात  दोन जणी.
एक बायको आणि एक ती .......................... ;)

कधी बायको आधी, अन नंतर येते ती.
कधी बायकोच्या आधी, college पासून ती.

मजेत असत married  life  त्या दोघीं मुळे,
घरात बायको अन बाहेर तिच्या मुळे.

दोघीं मुळे life कस comfortable असत.
घरात बायको अन बाहेर तिच्या वर dipend असत.

दोघीं बरोबर सगळ काही अस adjust होत,
life त्यांच्या शिवाय hell होऊन जात.

जरी असल्या दोघी  तरी काही problem नसतो.
बायकोच अन तीच relation normal असत.

फिरायला तिघही एकत्रच असतो,
दोघीनाही कारण काहीच complex नसतो.

काय म्हणता? आयुष्यात तुमच्या नाहीत दोन जणी? :(
म्हणजे लग्न झाल नाही? का नाही तुमच्या कडे गाडी?

प्रत्येक पुरशाच्या आयुष्यात असतात दोन जणी
एक बायको आणि एक गाडी............ :D

कधी बायको आधी, अन नंतर येते गाडी.
कधी बायकोच्या आधी, college पासून गाडी.

जितक्या जुन्या तितक्याच दोघी आवडत असतात
कितीही दिला त्रास तरी हव्याहव्याशा वाटतात.

जुनी बायको अन जुनी गाडी सारख्याच असतात,
ज्याच्या असतात त्यालाच त्यांचे नखरे माहित असतात.

देखणी बायको दुसर्याची, तरी आपली सोडववत   नाही
नवीन model छान तरी जुनी गाडी बदलवत नाही.

बायको जाता माहेरी घराबाहेरच रहाव वाटत.
गाडी जाता ग्यारेजला घरातच बर वाटत.

कलियुगी पती - चारित्र्याची  हीच खरी निशाणी,
आयुष्यभर व्रती जो, एक पत्नी, अन एक गाडी.

No comments:

Post a Comment